गुंतवणूक योग्य पद्धतीने आणि आवश्यकतेनुसार केली तर ती गुंतवणूक आपल्या स्वप्नपुर्तीसाठी मदत करते. आपल्या गुंतवणुकीसाठी पुढील सोनेरी नियम उपयोगात आणले तर नक्कीच आपले उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.
- गुंतवणूक नियमित करणे आवश्यक आहे.
- गुंतवणूक करत असताना दीर्घकाळ याचा अवश्य विचार करा.
- एकाच ठिकाणी मोठी गुंतवणूक न करता विविध गुंतवणूक साधनांमध्ये करावी.
- गुंतवणूक करताना भविष्यातील गरजांचा विचार करावा.
- गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे सर्व माहिती समजून घ्यावे.
- गुंतवणूक ही नेहमी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार करावी.
- गुंतवणूक करण्यापूर्वी नुकसान सहन करण्याची क्षमता तपासावी व व कुटुंबातील सदस्यांना देखील त्याची माहिती द्यावी.
- गुंतवणुकीची व्यवहार्यता 3 ते 5 वर्षानंतर तपासून घ्यावी.
- भविष्यात उद्भवणार्या अडचणीवर मात करण्यासाठी आपत्कालीन निधी नेहमी तयार ठेवावा.
- धोका व्यवस्थापन करण्यासाठी अपघात विमा आणि मेडिक्लेम पॉलिसी असणे आवश्यक आहे.
- वयाच्या पन्नाशीनंतर इक्विटी बाजारातील गुंतवणूक टाळावी.