3 brokers face probes for money laundering
देशातील तीन टॉप ब्रोकर्स देशातील विविध नियामक एजन्सीच्या रडारवर आले आहेत. या ब्रोकर वरती मनी लाँडरिंग आणि फेक ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी असल्याचे आढळले आहे. त्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितला आहे की देशातील वरिष्ठ राजकीय कुटुंबाशी (political exposed person) संदर्भात आणि देशातील औद्योगिक राज्य (industrial state) यामध्ये सहभागी आहेत. यांची पाठीमागील 4-5 वर्षापासून चौकशी सुरू आहे. हे भारतातील तीन टॉप ब्रोकर असून त्यांचा प्रमुख विविध बिजनेस सेगमेंट मध्ये ऍक्टिव्ह आहे. हा ग्रुप कॅपिटल मार्केट, वित्तीय सेवा जसे की ब्रोकरेज, इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर सर्विस, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, असेट मॅनेजमेंट फंड आणि नॉन बँकिंग फायनान्सर सर्विसेस या व्यवसायात सक्रिय आहे.
देशातील एजन्सी आणि रेग्युलेटरीज बॉडी ज्यामध्ये सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) आणि ED, CBI या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
चौकशी दरम्यान मनी लाँडरिंग ऍक्टिव्हिटीच्या नोंदी घेण्यात आले आहेत. टॉप रँकिंग ब्रोकर आणि वित्तीय सर्विस सेक्टर मधले संस्था सहभागी असल्याचे दिसून आले आहे. देशातील एजन्सी या मनी लॉन्ड्रीची चौकशी करण्यासाठी विदेशातील संस्थांच्या सोबत देखील संपर्कात आहेत. यामध्ये स्वित्झर्लंड यासंदर्भात अगोदरच गोपनीय माहिती सरकारला दिली आहे.
यामध्ये देशातील मोठ्या राजकीय प्रमुखांचा समावेश असल्याचे देखील बोलले जात आहे.
नाव न सांगण्याच्या अटी वरती देशातील टॉपच्या ब्रोकरन सांगितलं आहे की कोविडनंतर जे ब्रोकर खूप वेगाने देशात वाढले त्यांचा यामध्ये सहभाग असू शकतो.