6 ways to overcome losses in marathi
मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग असू द्या किंवा इक्विटी मार्केटमधील ट्रेडिंग असू द्या. कधीकधी मोठा लॉस पचवणे कठीण जाते. हा लॉस कधीकधी जबरदस्त धक्का देखील पोहोचवतो. आपण बऱ्याच वेळेला भावनांच्या आहारी जातो. आपल्याकडे असणारे नॉलेज आणि अनुभव ट्रेडिंगसाठी वापरत नाही.
त्यामुळे ट्रेडिंगमध्ये नुकसान झाल्यानंतर काय करावे? त्यास कसे सामोरे जायचे याचे सर्वोत्तम मार्ग आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
लॉस हा खेळाचा भाग आहे.
मित्रांनो ट्रेडिंगमध्ये प्रोफेशनल ट्रेडर देखील लॉस घेतात. या मार्केटमध्ये एकही व्यक्ती असा नाही ज्यांनी लॉस केला नाही. प्रॉफिट आणि लॉस हा खेळाचा भाग आहे तो तुम्ही समजून घ्या. लॉस झाल्यानंतर कधीही पॅनिक होऊ नका. नेहमी आशादायी राहा व दीर्घ काळाचा विचार करा आणि तुमच्या मध्ये सुधारणा करा.
मोठे नुकसान टाळा:
मित्रांनो ट्रेडिंगमध्ये आत्तापर्यंत जे नुकसान झाले आहे. ते फक्त मोठ्या ट्रेड मुळे आहे. त्यामुळे मोठा ट्रेड घेऊ नका. पोझिशन साईज छोटे ठेवून ट्रेडिंग करा. छोटे लॉस सहज कव्हर होतात. नेहमी स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करा.
ब्रेक घ्या:
ट्रेडिंग करताना मोठे नुकसान झाले असेल, तर लगेच ब्रेक घ्या. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करू नका. जेव्हा आपले नुकसान होते. तेव्हा आपली सायकॉलॉजी बिघडलेली असते. या सायकॉलॉजी मध्ये बरोबर निर्णय घेता येत नसतात. त्यामुळे अशा वेळेला ब्रेक घेणे फायद्याचे आहे.
बाजार टाळा:
दररोज ट्रेडिंग करणे टाळा. मार्केट ट्रेडिंगसाठी योग्य नसेल तर काही दिवस ट्रेडिंग बंद करणे. हे देखील लॉस कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अशा वेळेला इतर गोष्टींवर ती लक्ष द्या.
बदला घेण्यासाठी ट्रेडिंग करू नका :
बरेच ट्रेडर असा विचार करतात की, “माझा खूप लॉस झाला आहे. मी हा लॉस कव्हर करूनच थांबणार.” मित्रांनो ही खराब सायकॉलॉजी आहे. यामधून तुमचा लॉस कमी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे बदला घेण्यासाठी ट्रेडिंग करू नका.
ट्रेडिंग सोडून द्या:
होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे! कधीकधी, सोडून देणे ही कल्पना चांगली असते. ट्रेडिंग प्रत्येकासाठी नाही. यामुळे तुमची नोकरी, कौटुंबिक जीवन, मानसिक समाधान इ. खराब होऊ शकते.
शेवटी, ट्रेडिंगमध्ये नुकसान भरून काढणे हा तुमचा उद्देश नाही. हे पैसे कमविणे आहे. ट्रेडिंगमध्ये तुम्हाला भरपूर संधी मिळतील फक्त तुम्ही बाजारात टिकून राहा.
दिग्गज अभिनेता शाहरुख खान एकदा काय म्हणाला होता ते नेहमी लक्षात ठेवा, ” हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं :)”