आतापर्यंत तुम्ही 1, 2, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांचे शिक्के बघितले पण असतील आणि दररोज तुम्ही वापरत पण असाल. आता तुम्हाला 100 रुपयांचा (Rs 100 Coin) नाणं दैनंदिन वापरात आणण्याचा योग येऊ शकतो. भारत सरकार लवकरच 100 रुपयांचा नाणं बाजारात घेऊन येत आहे. त्यासाठीची तारीख ही निश्चित करण्यात येत आहे. भारत सरकारने ( Government of India ) यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, केंद्रीय प्राधिकरणांतर्गत जारी करण्यात येणाऱ्या टांकसाळींमध्ये केवळ शंभर रुपयांची नाणी पाडण्यात येतील, तयार करण्यात येतील. भारत सरकार 100 रुपयांचे नाणे कधी जारी करणार, ते कसे दिसेल, त्याची काय खास वैशिष्ट्ये आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. त्याविषयी जाणून घ्या.
100 रुपयांचा शिक्का लुक
भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार, 100 रुपयांच्या शिक्क्याचा गोलाकार 44 मिलीमीटर आहे. यामध्ये चांदी, तांबे, निकेल आणि जस्त यांच्या मिश्रणापासून एकत्र तयार झालेले असतील. नाण्याच्या मागील बाजूस अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या 100 रुपयांच्या नाण्यावर मायक्रोफोन बनवला जाईल आणि त्यावर 2023 लिहिले जाईल. नाण्याच्या एका बाजूला भारत लिहिलेले असेल आणि दुसऱ्या बाजूला INDIA लिहिलेले असेल आणि वरच्या शीर्षकाखाली ₹ हे चिन्ह अंकीत असेल.
बाजारात पोहोचण्यास इतका वेळ अपेक्षित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाचे शंभर एपिसोड पूर्ण होत आहेत. या निमित्ताने 100 रुपयांचा शिक्का जारी करण्यात येणार आहे. या शिक्क्यावर ‘मन की बात 100’ (Mann Ki Baat) असे लिहिलेले असेल. 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात 100’ कार्यक्रम होत आहे. हे नाणे दररोजच्या व्यापक व्यवहारासाठी उपलब्ध असेल की नाही हे अजून पर्यंत स्पष्ट नाही.