बुलिश मारूबोझू आणि बेअरीश मारूबोझू पॅटर्न Bullish and Bearish Candlestick Patterns

बुलिश मारूबोझू पॅटर्न   (bullish marubozu)

टेक्निकल अनालिसिस मध्ये जे काही महत्त्वाचे पॅटर्न आहेत यामध्ये मारूबोझू  हा एक महत्त्वाचा पॅटर्न आहे आणि याचे चर्चा आज आपण करणार आहे.

हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.  ज्याचा टेक्निकल एनालिसिस मध्ये बुलिशनेस म्हणजे  बुलिश तीव्रता दर्शविण्यासाठी उपयोगात आणला जातो.  म्हणजेच मार्केट किती स्ट्रॉंग बुलिश आहे हे या कॅण्डल मधून दिसते.

मारूबोझू या शब्दाचा जापनीज भाषेत अर्थ ‘टक्कल पडणे म्हणजे केस नसलेला असा होतो. बुलिश मारूबोझू  ही मूळात लांब व्हाइट किंवा ग्रीन रंगाची बुलिश कॅन्डल  असते.  या कॅन्डलच्या वरच्या किंवा खालच्या  बाजूला शॅडो नसते किंवा  खूप छोटी  शॅडो असते. ही कॅन्डल तेजीचा मजबूत संकेत समजली जाते. या कॅन्डलमध्ये ओपन प्राईस आणि लो प्राईस सेम असते.या कंडिशनला आपण मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवून कॉल ऑप्शन (CE Option) Buy करण्याची   संधी  शोधू शकतो.

बेअरीश मारूबोझू पॅटर्न (bearish marubozu)

बेअरीश मारूबोझू  हा सिंगल कॅन्डलस्टिक पैटर्न आहे ज्याचा टेक्निकल एनालिसिस मध्ये   बेअरीशनेस किंवा मंदीचा अंदाज दर्शविण्यासाठी उपयोगात आणला जातो. म्हणजेच मार्केट किती स्ट्रॉंग बेअरीश आहे हे या कॅण्डल मधून दिसते. बेअरीश मारूबोझू ही मूळात लांब ब्लॅक किंवा रेड रंगाची बेअरीश कॅन्डल आहे जिच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला शॅडो नसते किंवा नगण्य प्रमाणात असते. या कॅन्डलमध्ये ओपन प्राईस आणि हाय प्राईस सेम असते.या कंडिशनला आपण मार्केटवर बेअरीश व्ह्यू ठेवून PE Option Buy करण्याची  संधी  शोधू शकतो. 

Nifty Bank 2023 05 03 12 26 03