Gold Rate Today :सोन्याची मागणी वाढली; आजही सोन्याचे भाव स्थिर

Gold price today : 15 एप्रिल, आज जागतिक बाजारात सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. तर चांदीमध्ये किंचित वाढ झाली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात लग्नसराईमुळे खरेदी वाढल्याने भाव वधारले झाले आहेत. एमसीएक्स गोल्ड (MCX Gold) जून वायदा (Future) 18 रुपयांच्या मजबूतीसह 60,906 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसत आहेत. तर चांदीचा जुलै वायदा (Future) 68 रुपयांच्या वाढीसह 73,122 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता.

गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा जून वायद्याचा भाव 60,887 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावला होता. तर चांदीचा जुलै वायदा प्रतिकिलो 73,054 रुपयांवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज कमजोरी दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड 0.33 डॉलरने घसरून 2,011.05 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. तर स्पॉट सिल्व्हर 0.02 डॉलरने वधारून 22.98 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

(वरील सोने चांदीचे दर कोणतेही मेकिंग चार्जेस किंवा कर वगळून देण्यात आले आहेत)