मित्रांनो दररोजच्या धावपळीच्या आणि सामाजिक माध्यमांच्या जीवनामध्ये आपण आपली वैयक्तिक माहिती बऱ्याच ठिकाणी शेअर करत असतो. पाठीमागे चार ते पाच वर्षात जसा स्मार्टफोन इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर समाजामध्ये वाढला त्याच बरोबर आर्थिक फसवणुकीचे प्रमाण देखील वाढताना दिसून आले आहे. यास नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो चा डेटा देखील सपोर्ट करत आहे. मित्रांनो भारतात जत जसे डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढत आहे त्याचबरोबर फिनान्शियल प्रॉडक्ट देखील प्रमाण वाढत आहे. 42% भारतीयांनी गेल्या 3 वर्षात आर्थिक फसवणुकीचा अनुभव घेतला आहे आणि 74% लोक पैसे परत मिळवण्यात अयशस्वी झाले आहेत.मित्रांनो फायनान्शिअल फ्रॉड कसे केले जातात व फसवणूक कशी केली जाते यावरती नेटफ्लिक्सला जामतारा म्हणून खूप मोठी वेब सिरीज देखील आली. यावरून आपणास याचे गांभीर्य लक्षात आलेच असेल. आर्थिक फसवणूक कोणाचीही आणि कधीही होऊ शकते. आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वतः खबरदारी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आर्थिक फसवणूक टाळण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिपा आहेत:
- अनोळखी फोन कॉल्स, ईमेल किंवा मजकूर संदेशांपासून सावध रहा: स्कॅमर वित्तीय संस्था किंवा सरकारी एजन्सीचे असल्याचे भासवून तुमच्याशी संपर्क साधू शकतात. ते तुमची वैयक्तिक माहिती विचारू शकतात किंवा तुम्हाला असा करार देऊ शकतात जे खरे असायला खूप चांगले वाटते. अशा अनोळखी संभाषणाबद्दल (संप्रेषणाबद्दल) सावध रहा आणि कोणतीही वैयक्तिक माहिती शेअ करण्यापूर्वी कॉलर किंवा पाठवणार्याची ओळख तपासून बघा. खरंतर कुठलीही वित्तीय संस्था फोन करून किंवा मेल करून तुमची वैयक्तिक गोपनीय माहिती मागवत नसते.
- तुमची वैयक्तिक माहिती संरक्षित करा: तुमची वैयक्तिक माहिती जसे की बँक खाते तपशील किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक शेअर करू नका, त्याचबरोबर सी सी क्रमांक, ओटीपी, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड, किंवा एटीएमचा पिन. हे देखील कधीही कुणासोबत शेअर करू नये. तुमचे पासवर्ड आणि पिन गोपनीय ठेवा आणि ते कमीत कमी सहा महिन्यानंतर नियमितपणे बदला. आणि सर्वात महत्त्वाचं जे तुमचे वैयक्तिक गोपनीय पासवर्ड आहेत ते एका वहीमध्ये लिहून घरातील फॅमिली मेंबरच्या जवळ ठेवावेत सुरक्षित ठिकाणी.
- तुमच्या आर्थिक विवरणांचे निरीक्षण करा: कोणत्याही अनधिकृत व्यवहारांसाठी तुमचे बँक स्टेटमेंट, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट आणि इतर आर्थिक स्टेटमेंट नियमितपणे तपासा. तुम्हाला कोणतीही संशयास्पद ट्रांजेक्शन दिसल्यास, ताबडतोब तुमच्या बँकेची किंवा संस्थेशी संपर्क साधा.
- सुरक्षित वेबसाइट वापरा: ऑनलाइन खरेदी करताना किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करताना केवळ सुरक्षित वेबसाइट वापरा. तुमच्या ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये पॅडलॉक चिन्ह आणि वेबसाइट अॅड्रेसमध्ये “https” प्रोटोकॉल शोधा.अलीकडे फेक वेबसाईट तयार करून खूप साऱ्या डेटा चोरला जातो व त्याचा अशा फसवणुकीसाठी वापर केला जातो. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना अधिकृत वेबसाईटवरूनच करावा.
- अँटी-व्हायरस आणि अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर स्थापित करा: हॅकिंग आणि मालवेअर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या संगणकावर आणि मोबाइल डिव्हाइसवर अँटी-व्हायरस आणि अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर वापरा.
- गुंतवणुकीच्या घोटाळ्यांपासून सावध रहा: कमी जोखमीसह उच्च परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींपासून सावध रहा. गुंतवणुकीची संधी देणार्या व्यक्तीची क्रेडेन्शियल्सची पडताळणी करा.2020 नंतर भारतासह जगभरातील सर्वच देशात गुंतवणूक घोटाळ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर तुम्हाला कोण जास्त परताव्याचे हमी देत असेल तर याचा अर्थ तिथं शंभर टक्के काहीतरी काळाबाजार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त परताव्याच्या गुंतवणूक योजना पासून नेहमी दोन हात लांब राहा.
- स्वतःला अर्थसाक्षर अर्थसक्षम करा: नवीनतम घोटाळे आणि फसवणूक योजनांबद्दल माहिती मिळवा आणि आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ते शिका. स्वतःला अर्थसाक्षर बनवण्यासाठी रिझर्व बँक त्याचबरोबर भारत सरकारच्या अन्य संस्था या संदर्भात कार्य करत आहेत त्यांच्या संपर्कात रहा. त्याचबरोबर हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे नातेवाईक मित्र यांच्यासोबत शेअर करा व आपल्या प्रियजनांना अशा नुकसानापासून वाचवा.
ही पावले उचलून, तुम्ही आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता
सर, ऑपशन ट्रेडिंग बद्दल माहिती वाचायला आवडेल तसेच व्यक्तीने आपल्या टार्गेट किती ठेवावं ,रिस्क कॅपॅसिटी कशी decide करायची,स्टॉप लॉस घेणं हे कसं चांगल आहे याबद्दल मार्गदर्शन मिळावे.