गृहनिर्माण वित्त क्षेत्रातील कंपनी इंडिया शेल्टर फायनान्सचा आयपीओ पुढील आठवड्यात बुधवारी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी उघडणार आहे. या आयपीओमध्ये 15 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. कंपनी आयपीओतून 1,200 कोटी रुपये उभारणार आहे.
प्रति शेअर किंमत: आयपीओसाठी कंपनीने 469-493 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ 12 डिसेंबर रोजी उघडेल.
आयपीओचा आकार: या आयपीओमध्ये 800 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 400 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकले जातील.
आयपीओमध्ये किती शेअर्स उपलब्ध आहेत?: आयपीओमधील 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs), 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15 टक्के बिगर संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.
आयपीओचे वाटप कसे होईल?: इंडिया शेल्टर फायनान्सचा आयपीओ T+3 लिस्टिंग नियमांतर्गत बाजारात येत आहे. त्यानुसार 18 डिसेंबरपर्यंत इंडिया शेल्टरच्या शेअर्सचे वाटप निश्चित केले जाईल.
आयपीओमध्ये किती गुंतवणूक करावी?: गुंतवणूकदार किमान 30 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर त्याच्या पटीत बोली लावू शकतात.
आयपीओचा जीएमपी काय आहे?: जीएमपी (GMP) म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम. सध्या, इंडिया शेल्टर फायनान्सच्या शेअर्सचा जीएमपी शून्य दाखवत आहे.
आयपीओचे रजिस्ट्रार कोण आहेत?: केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड या आयपीओचे रजिस्ट्रार आहेत. शेअर्स बीएसई आणि एनएसईमध्ये सूचीबद्ध होतील.
आयपीओ कधी सूचीबद्ध होईल?: हा आयपीओ T+3 लिस्टिंग नियमांतर्गत बाजारात येत असल्याने तो 20 डिसेंबर रोजी सूचीबद्ध होईल असे मानले जाते.
इंडिया शेल्टर फायनान्स ही एक अनुभवी कंपनी आहे. जी परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने आतापर्यंत 60 हजार कुटुंबांना घर देण्यासाठी कर्ज दिले आहे. कंपनीच्या भारतातील जवळपास 15 राज्यांमध्ये 180 शाखा आहेत.