30 सप्टेंबर नंतर दोन हजाराची नोट बंद:  रिझर्व बँकेचे घोषणा

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच 2016 साली 500 आणि 1000 रुपयांची नोट  चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या.  त्यावेळी चलनात नव्याने दोन हजाराची नोट समाविष्ट करण्यात आली होती.  मात्र आता रिझर्व बँकेने ही नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे की  ही  हा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत चलनात असणार आहे. त्यानंतर ही नोट चलनातून बाद होणार आहे. त्यामुळे आता आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

किती रकमेपर्यंत नोटा बदलू शकतो?

30 एप्रिल 2023 अखेरीस  देशातील एकूण चलनाच्या  नोटांपैकी  फक्त 10.8 टक्के  नोटा ह्या दोन हजार रुपयांच्या आहेत. मार्च 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने 7 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. आरबीआयच्या मते, 23 मे 2023 पासून जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. 

आरबीआयने बँकांना दिला आदेश

आरबीआयने आदेशात  सर्व राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांना नव्याने दोन हजार रुपयांच्या नोटा जारी करण्यास मनाई केली आहे. आरबीआयने आपल्या आदेशात हे स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे सामन्य नागरिकांना बँकांच्या एटीएममधून 2 हजार रुपयांची नोट मिळणार नाही.

आरबीआयने काय सांगितलं आहे

दोन हजार रुपयांच्या नोटांचा चलनात आणि दैनंदिन व्यवहारात वापर  कमीच होता.  असे रिझर्व बँकेला आढळून आले होते.  लोकांची रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा पर्याप्त स्टॉकमध्ये आहेत.  त्यामुळे  रिझर्व बँकेने 2018-19 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद  केलेली आहे.