टेलिग्रामवर सेबीचा हातोडा

सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) सहा जणांवर तीन वर्षांची बंदी घालत  घातली आहे.  या सदस्यांना  2.84 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यांच्यावर सेबीने आरोप केला आहे की  हे 6 लोक स्वतःला रिसर्च ऍनालिस्ट म्हणून घेत होते. आणि  टेलिग्रामच्या माध्यमातून विशिष्ट शेअर्सवर खरेदीचा सल्ला देत होते.  हे सहा जण स्वतःला 40 वर्षाचा स्टॉक मार्केटचा अनुभव असल्याचे देखील सांगत असल्याचे सेवेच्या निदर्शनास आले आहे. सेबीने या 6 जणांना 45 दिवसांत दंडाची रक्कम भरण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय 1.85 कोटी रुपये बेकायदेशीरपणे कमावलेल्या या लोकांनी व्याजासह परत करावेत, असेही निर्देश 26 एप्रिल 2023 रोजी पारित केलेल्या आदेशाने दिले आहेत. यासंदर्भात सेबीला 12 जानेवारी  2021 मध्ये दोन तक्रारी मिळाल्या होत्या. 

6 कोण आहेत 

हिमांशू महेंद्रभाई पटेल, राज महेंद्रभाई पटेल, जयदेव जाला, महेंद्रभाई बेचरदास पटेल, कोकिलाबेन महेंद्रभाई पटेल आणि अवनीबेन किरणकुमार पटेल यांच्यावर सेबीने 3 वर्षांची बंदी घातली असून 2.84 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने आपल्या आदेशात सांगितले की हिमांशू, राज आणि जयदेव हे टेलिग्राम चॅनल @bullrun2017 चे (बुल रन इन्व्हेस्टमेंट एज्युकेशनल चॅनल) ऍडमिन होते. या चॅनलमध्ये 49000 हून अधिक सदस्य होते. 

telegram

कसा नफा कमावला

सेबीला तपासात असे आढळून आले की हे 6 लोक  टेलीग्राम वर स्टॉक खरेदीसाठी सुचवण्यापूर्वी  स्वतःच्या डिमॅट अकाउंट मध्ये त्याला खरेदी करत होते.  त्यानंतर टेलिग्राम मधील सदस्यांना तो स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत असत.  टेलिग्राम चॅनेल मध्ये  49 हजारांहून अधिक सदस्य असल्याने त्यांच्या खरेदीमुळे शेअर्सची मागणी वाढायची आणि परिणामी त्यांचे भाव वाढायचे.  स्टॉक चे भाव वाढले की ते स्वतः प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचे आणि त्यानंतर बाकीचे सदस्य त्या स्टॉक मध्ये अडकायचे. यासाठी त्यांनी जास्त तर स्मॉल कॅप स्टॉकची निवड केली होती. 

किती स्टॉक सुचवले

सेबीला तपासाच्या दरम्यान असे आढळून आले आहे की यांनी जवळपास 184 स्टॉक ग्रुप मधील सदस्यांना खरेदी करायला लावले. व त्याच्या माध्यमातून स्टॉकच्या प्राईस मॅन्युक्युलेट करण्यात आल्या. व यादरम्याने त्यांनी बक्कळ पैसा देखील कमावला. या स्टॉक मधून त्यांनी जवळपास तीन कोटी रुपयांचा नफा कमवला होता. या सहा जणांनी कसा प्रॉफिट मिळवला आणि किती मिळवला हे पुढील इमेज मध्ये बघू शकता.

prfoit

तुम्ही काय काळजी घ्यावी

  • मित्रांनो कोणत्याही स्मॉल कॅप स्टॉकच्या संदर्भात कुठला टेलिग्राम चैनल किंवा युट्युब चॅनेल तो समभाग खरेदी करण्यासाठी सल्ला देत असेल तर अशा स्टॉक पासून सावध राहा.
  • व्हाट्सअप ब्रॉडकास्टिंग ग्रुप मधून कोणताही सल्ला घेऊ नका.
  • कमी कालावधीत जास्त पैसे मिळवण्याची स्वप्न बघू नका.
  • गुंतवणूक करण्यापूर्वी स्टॉकचे फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस तपासून बघा.
  •  कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करताना कमीत कमी रिस्क घ्या.