Bazaar Bull

Tuesday, March 25, 2025
spot_img
Homeशेअर बाजारस्टॉक ट्रेडिंग stock trading in Marathi

स्टॉक ट्रेडिंग stock trading in Marathi

-

 ट्रेडिंग म्हणजे काय 

स्टॉक ट्रेडिंग stock trading in Marathi: ट्रेडिंग म्हणजे म्हणजे दोन संस्थांमधील वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होय. संस्था हे गुंतवणूकदार/  ट्रेडर्स  आहेत. जे वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉकची  खरेदी विक्री करीत असतात. शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडिंग मोठ्या प्रमाणात रिटेल ट्रेडर आणि संस्थांकडून केले जाते.ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगचे प्रमाण 2019 नंतर भारतात वाढले आहे.  विशेषता शहरी भागात ट्रेडिंगचे प्रमाण अधिक जाणवते. ग्रामीण भागात देखील याचा प्रसार होत आहे. ज्याप्रमाणे किराणा दुकानात दुकानदार वस्तू खरेदी करतो. त्याच वस्तू परत जास्त किमतीला ग्राहकाला विकतो. यालाच ट्रेडिंग असे म्हणतात. म्हणजेच शेअर्स कमी किमतीला खरेदी करायचे आणि किंमत वाढल्यानंतर विकायचे यालाच शेअर्स ट्रेडिंग असे म्हणतात. 

 ट्रेडिंगच्या इतिहास 

प्राचीन काळापासून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. तेव्हापासून ट्रेडिंग ही संकल्पना अस्तित्वात आली आहे.  मानवी सभ्यतेच्या विकासाबरोबर शेतीचा देखील विकास झाला.  तेव्हापासून विविध वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री सुरू आहे.  परंतु प्राचीन काळी वस्तू विनिमय पद्धतीने ट्रेडिंग केले जात. परंतु या पद्धतीत उत्पादनाचे मूल्य मोजण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या ठिकाणी पैशाचा वापर सुरू झाल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले. यातूनच ट्रेडिंगचा जन्म झाला. ट्रेडिंगच्या उदयाचा इतिहास खूप मोठा आहे. जो युरोप आणि इंग्लंड पासून सुरू होतो.  परंतु  भारत आणि आशियातील ऑनलाइन ट्रेडिंगसाठी पहिले एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज होते. ज्याची स्थापना 1875 मध्ये झाली होती .  सध्या भारतात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजसह बीएसई ही दोन स्टॉक एक्सचेंज आहेत जेथे मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग केले जाते.

ट्रेडर कोणाला म्हणतात

जी व्यक्ती किंवा संस्था दररोज विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करते आणि विकते त्याला ट्रेडर असे म्हणतात. जे विविध कंपन्यांच्या स्टॉक मध्ये खरेदी विक्री करतात त्यांना स्टॉक ट्रेडर असे म्हणतात.  काही ट्रेडर हे इंडेक्स ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात त्यांना इंडेक्स ट्रेडर असे देखील म्हणतात. ट्रेडिंग करत असताना प्रत्येक ट्रेडरचे पहिले टारगेट नफा मिळवणे हेच असते. नफा मिळवत असताना रिस्क मॅनेजमेंट करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. 

ट्रेडिंगला कशी सुरुवात करावी

ट्रेडिंगला सुरुवात करणे खूप सोपे आहे.  अलीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ट्रेडिंगची सुविधा सर्वसामान्य गुंतवणूकदाराला उपलब्ध झाले आहे.  ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याकडे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे.  डिमॅट अकाउंट मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट देखील ऍक्टिव्ह करू शकतो. ट्रेडिंगला सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक असते हे डिमॅट अकाउंट आपण कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमधून किंवा कोणत्याही डिस्काउंट ब्रोकर मार्फत ओपन करू शकतो.  डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन केल्यानंतर सहज पद्धतीने त्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये शेअरची खरेदी विक्री करता येते. 

डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी काय करावे लागते

गुंतवणूकदार किंवा ट्रेडर यांना डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील कागदपत्रे अनिवार्य आहेत.  ती पुढील प्रमाणे आहेत.

पॅन कार्ड

आधार कार्ड

कॅन्सल धनादेश 

सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

मोबाईल नंबर 

ईमेल आयडी

ई केवायसी

व्हिडिओ केवायसी

स्टॉक मार्केटमधील ट्रेडिंगचे प्रकार

शेअर ट्रेडिंग मध्ये प्रामुख्याने पुढील  ट्रेडिंगचे  प्रमुख प्रकार आहेत. ट्रेडिंगचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

1) डे ट्रेडिंग Day Trading 

या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात स्टॉकचे खरेदी आणि विक्री  करणे समाविष्ट असते.  यामध्ये खरेदी विक्रीचा कालावधी खूप कमी असतो. तो एक मिनिटापासून काही तासापर्यंत असू शकतो.  डे ट्रेडिंग आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत. सुरू असते. आठवड्यातील  सरकारी किंवा सार्वजनिक  सुट्ट्या वगळता. अशा  ट्रेडिंगमध्ये गुंतलेल्या  ट्रेडर्सने  3.30 PM च्या अगोदर सर्व पोझिशन क्लोज करणे आवश्यक असते. डे ट्रेडिंगसाठी  तुमच्याकडे कमीत कमी दीड ते दोन वर्षाचा अनुभव असेल तरच सुरुवात करावी.  यामध्ये रिस्क  प्रमाण उच्च मानले जाते.   बाजाराचे सखोल ज्ञान आणि स्टॉकच्या चढ उताराचा अभ्यास देखील असणे आवश्यक आहे.

2) स्कॅल्पिंग scalping trading 

या ट्रेडिंग प्रकाराला मायक्रो-ट्रेडिंग असेही म्हणतात. स्कॅल्पिंग आणि डे-ट्रेडिंग हे दोन्ही इंट्राडे ट्रेडिंगचे  प्रकार आहेत.  स्कॅल्पिंगमध्ये  दिवसभरात छोटे टार्गेट आणि छोटा स्टॉप लॉस घेऊन भरपूर ट्रेड टाकले जातात.  प्रोफेशनल स्काल्पर दिवसात कमीत कमी 100   पेक्षा अधिक ट्रेड टाकतात. यामध्ये पोझिशन काही मिनिटांसाठी फक्त ओपन केले जाते. स्काल्पिंग ट्रेडिंग प्रामुख्याने अल्गोरिदमच्या साह्याने केले जाते.

3) स्विंग ट्रेडिंग Swing trading

स्टॉक मार्केट ट्रेडिंगची ही पद्धत अल्पकाळासाठी स्टॉक मध्ये पोझिशन घेण्यासाठी वापरली जाते. स्विंग ट्रेडिंगचा वापर स्टॉक खरेदी केल्यानंतर काही दिवसांत नफा मिळविण्यासाठी केला जातो.  स्विंग ट्रेडिंग चा कालावधी एक दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत असू शकतो.  यामध्ये ट्रेडरचे टारगेट पूर्ण झाल्यानंतर तो बाहेर पडतो.  स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रामुख्याने चार्टवर आधारित ट्रेडिंग केले जाते.  त्यासाठी विविध  बुलिश चार्ट पॅटर्नचा वापर  केला जातो.  त्याचबरोबर स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेक्निकल अनालिसिस प्राईस ॲक्शन देखील उपयोगात आणले जाते. हा ट्रेडिंगचा एक सुरक्षित मार्ग मानला जातो.  व्यवसायिक आणि नोकरदार यांच्यासाठी हा ट्रेडिंगचा आदर्श प्रकार आहे. 

4) मोमेंटम ट्रेडिंग movement trading

मोमेंटम ट्रेडिंगच्या बाबतीत, ट्रेडर स्टॉकच्या हालचालीचा फायदा घेतो. या प्रकारचे ट्रेडिंग करण्यासाठी बऱ्याच वेळेला टेक्निकल इंडिकेटर चा आधार घेतला जातो.  यामध्ये मूवी अवरेजेस प्रामुख्याने वापरली जातात. 

5) पोझिशन ट्रेडिंग

अल्प-मुदतीच्या किंमतींच्या हालचालींऐवजी स्टॉकच्या दीर्घकालीन वाढीचा फायदा घेण्यासाठी पोझिशन ट्रेडर्स केले जाते. या ट्रेडिंगमध्ये स्टॉक चे खरेदी करून तो कमीत कमी सहा महिन्यासाठी होल्ड केला जातो.   या ट्रेडिंग प्रकारात अल्पकालीन हालचालीकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन किमतीकडे लक्ष दिले जाते. दीर्घकाळात मोठी संपत्ती तयार करण्यासाठी या प्रकारच्या ट्रेडिंगला प्राधान्य दिले जाते. 

ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तुम्हाला देखील ट्रेडिंग शिकायचे असेल तर आजच आपल्या Bazaarbull यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

🚀 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्याची संधी! 🚀

तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचंय? आजच सुरुवात करा!

काय करायचंय:
1️⃣ आमच्या दिलेल्या लिंकद्वारे डिमॅट अकाउंट ओपन करा.
2️⃣ आमच्या प्रीमियम लर्निंग ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
3️⃣ तुमचा ट्रेडिंग प्रवास सुरू करा!

तुमचा प्लॅटफॉर्म निवडा:
✔️ Zerodha: आता अकाउंट उघडा
✔️ Angel One: आता अकाउंट उघडा

📩 ताबडतोब लिंकवर क्लिक करा आणि आजच डिमॅट अकाउंट उघडा!

Santosh suryawanshi
Santosh suryawanshihttps://bazaarbull.in
Dr.Santosh Suryawanshi Ph.D & SET in Economics NISM & NCFM Certified

LATEST POSTS

तीन आऊटसाईड अप पॅटर्न: प्रभावी ट्रेडिंग पद्धत

तीन आऊटसाईड अप पॅटर्न: प्रभावी ट्रेडिंग पद्धत: हा एक प्रभावी candlestick reversal pattern आहे जो ट्रेंड बदल दाखवण्यासाठी वापरला जातो. हा पॅटर्न विशेषतः डाउनट्रेंडमध्ये दिसतो...

Three Inside Up Candlestick Pattern in Marathi (थ्री इनसाईड अप कॅंडलस्टिक पॅटर्न)

Three Inside Up Candlestick Pattern in Marathi (थ्री इनसाईड अप कॅंडलस्टिक पॅटर्न)

मॉर्निंग स्टार पॅटर्न म्हणजे काय?

मॉर्निंग स्टार पॅटर्न म्हणजे काय?

Follow us

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Most Popular

spot_img

You cannot copy content of this page