Saturday, June 15, 2024
spot_img
Homeगुंतवणूकमोठ्या सिमेंट कंपनीवर इन्कम टॅक्सचा छापा, शेअरवर परिणाम

मोठ्या सिमेंट कंपनीवर इन्कम टॅक्सचा छापा, शेअरवर परिणाम

श्री सिमेंटवर आयकर विभागाने छापे टाकल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील श्री सिमेंट लिमिटेडच्या अनेक ठिकाणी  आयकर विभागाने छाप्यांमध्ये ₹ 23000 कोटींची मोठी करचोरी  पकडली आहे.  सूत्रांनी सांगितले की, या छाप्यात 23000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. समूहाकडून वर्षाला 1200-1400 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक  करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

23000 कोटी रुपयांच्या कपातीचा दावा

वृत्तानुसार, 23000 कोटी रुपयांच्या डिडक्शन क्लेम   करणाऱ्या कागदपत्रांची माहिती इन्कम टॅक्सला मिळाली आहे. छापे टाकल्यानंतर अनेक कंपनीचे संचालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी करचोरी असल्याचे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

कंपनीने काय सांगितले

कंपनीने याला आपल्या कार्यालयात आयकर विभागाने सर्वेक्षण केल्याचे मान्य केले आहे. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, “आम्हाला आढळले आहे की आयकर सर्वेक्षणाच्या संदर्भात कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांबद्दल बरीच नकारात्मक माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केली जात आहे.” आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की सर्वेक्षण अद्याप चालू आहे. कंपनीची संपूर्ण व्यवस्थापन टीम उपलब्ध असून अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे.

कंपनीने पुढे म्हटले आहे की “कोणत्याही माध्यमात प्रसारित केलेली कोणतीही माहिती चुकीची आहे आणि कंपनीकडून पूर्व इनपुट न घेता प्रकाशित करण्यात आली आहे. हे तुमच्या माहितीसाठी आणि रेकॉर्डसाठी आहे.” श्री सिमेंटचे शेअर्स शुक्रवारी 1.94 टक्क्यांनी घसरून 25,159.55 रुपयांवर बंद झाला आहे..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page