मित्रांनो 01एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेला आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नवीन आर्थिक वर्षांमध्ये बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन देखील केलेले आहे. परंतु मित्रांनो तुमच्या मनामध्ये हा देखील एक प्रश्न असेल आपण पैसा कुठे गुंतवायचा आणि कुठे गुंतवायचा नाही या विचारत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे.गुंतवणुकीवर चांगला परतावा आणि सुरक्षिततेची हमी असणारी योजना म्हणजे मुदत ठेव योजना त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या परताव्याबरोबर करमाफीचा देखील लाभ या योजनेमध्ये मिळू शकतो ती योजना म्हणजे टॅक्स सेविंग एफडी स्कीम.
कर बचत मुदत ठेव योजना चांगली गुंतवणूक?
या करबचत मुदत ठेव योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. आपण एकदा यामध्ये पैशाची गुंतवणूक केली का तो पैसा पुढील साठ महिन्यासाठी लॉक होतो. जर काही आर्थिक आणीबाणीमुळे 5 वर्षापूर्वी म्हणजे मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्यासाठी कोणतीही सूट नाही. मात्र एफडी धारकाचा मृत्यू झाल्यास, वारसदाराला मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
जादा व्याजावर टीडीएस लागू
टॅक्स सेव्हिंग एफडीवर कोणताही कर लागू होत नाही. परंतु, आपण गुंतवलेल्या पैशावर मिळणारे व्याज एका वर्षात 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. तर मात्र कर भरावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत, सूट मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे.
टॅक्स सेव्हिंग एफडीचे फायदे कोणते आहेत?
- आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट
- एका वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट
- व्याज दर 5 वर्षांसाठी निश्चित तसेच जोखीम नाही.
- बचत खात्यांपेक्षा एफडीमध्ये जास्त व्याज मिळवण्याची क्षमता असते.
- एफडी फक्त एकरकमी (One Time )ठेव ठेवण्याची परवानगी देतात.
- ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज
- मॅच्युरिटी आणि ऑटो-नूतनीकरणापूर्वी एफडी तोडण्याची सुविधा नाही.
टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
- आयडी प्रूफ (आधार कार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट)
- पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, युटिलिटी बिल, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट)
- स्वाक्षरीचा पुरावा (पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
- 2 पासपोर्ट आकाराचे फोटो
गुंतवणुकीची किमान आणि कमाल मर्यादा
या बचत ठेऊ योजनेमध्ये कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त प्रतिवर्षी दीड लाखापर्यंत ची गुंतवणूक करू शकतो.
यामध्ये वैयक्तिक किंवा जॉइंट अकाउंट या दोन्ही मधून ही एफडी करता येते.
एप्रिल 2022 अखेरीस पुढील प्रमाणे या एप्रिल वर व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.