Technical Analysis in Marathi: मार्केटमध्ये विविध स्टॉकच्या चार्टच्या आधारे जो अभ्यास करण्यात येतो त्याला टेक्निकल ॲनालिसिस असे म्हणतात. हे विश्लेषण करण्यासाठी स्टॉकची किंमत आणि व्हॉल्यूमसह अन्य चार्ट आणि चार्ट पॅटर्नचे ॲनालिसिस उपयोगात आणले जाते. हे चार्ट पॅटर्न बाजाराची दिशादर्शक म्हणून काम करतात. या विश्लेषणाच्या सहाय्याने, एखाद्या स्टॉकची सध्या काय स्थिती आहे ? आणि हा स्टॉक भविष्यात काय करू शकतो ? याचा अंदाज आपल्याला पाठीमागील स्टॉकच्या किमती बघून बांधता येतो.
टेक्निकल ॲनालिसिस मदतीने आपण एखाद्या स्टॉक मध्ये कधी खरेदी करावी आणि कधी विक्री करावी याचे निर्णय घेता येतात. विशेषता अल्प कालावधीत ट्रेडिंग करताना याचा वापर प्रामुख्याने अधिक होतो.या विश्लेषणाच्या साह्याने स्टॉकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे हे समजते. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टींवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे त्यामध्ये टेक्निकल अनालिसिसचा स्थान सर्वोच्च आहे.
Tools of Technical Analysis टेक्निकल अनालिसिस मध्ये कशाचा वापर केला जातो
टेक्निकल अनालिसिस मध्ये वापरल्या जाणार्या काही मूलभूत संकल्पना पुढील प्रमाणे आहेत.
सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल : ही स्टॉकचे किंमत पातळी असते ज्यावर स्टॉकची किंमत ऐतिहासिकदृष्ट्या वर किंवा खाली ब्रेक करून जाण्यासाठी प्रयत्न करते. या लेवलला सपोर्ट आणि रजिस्टन्स असे म्हणतात. सपोर्ट म्हणजे ज्या ठिकाणी स्टॉक ची किंमत घसरण्याचे थांबते. रजिस्टन्स म्हणजे ज्या ठिकाणी स्टॉकचे वाढ थांबते ती लेवल होय.
ट्रेंड (Trend): स्टॉकची किंमत ज्या दिशेने फिरत आहे ती सामान्य दिशा म्हणजे ट्रेंड. मार्केटमध्ये कोणत्याही स्टॉकचा ट्रेंड तीन प्रकारे असतो.ट्रेंड वरच्या दिशेने (तेजी Bullish), ट्रेंड खालच्या दिशेने (मंदी bearish) आणि सॅडवेज मार्केट असतो.

मूव्हिंग ॲव्हरेज: मूव्हिंग अव्हरेजचा वापर स्टॉकच्या किमतीतील चढउतार आणि आणि ट्रेंड ओळखण्यासाठी केला जातो. गुंतवणूकदार आणि ट्रेडर 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज वापरतात.मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर प्रत्येकाचा अनुभव आणि काम करण्याची पद्धत यासाठी महत्त्वाचा आहे.
टेक्निकल इंडिकेटर्स : एखाद्या स्टॉक मध्ये सध्या खरेदीसाठी संधी आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी टेक्निकल इंडिकेटर्स चा वापर केला जातो. बाजारात 500 पेक्षा अधिक टेक्निकल इंडिकेटर. त्यापैकी काही लोकप्रिय इंडिकेटर्स मध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI), मूव्हिंग अॅव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स (MACD), आणि बोलिंगर बँड यांचा समावेश होतो.
चार्ट पॅटर्न: चार्ट पॅटर्न हे स्टॉकच्या हालचालीचे प्रतिबिंब दाखवतात. चार्टचा अभ्यास करून आपण स्टॉक मध्ये खरेदी करण्यासाठी संधी शोधू शकतो. प्रत्येक ट्रेडरचा ट्रेडिंगसाठीचा चार्ट पॅटर्न हा वेगळा असू शकतो. डबल टॉप, डबल बॉटम, रेक्टेंगल पॅटर्न, रायझिंग वेज, सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न असे विविध लोकप्रिय पॅटर्न आहेत.

Objective of Technical Analysis टेक्निकल अनालिसिस उद्दिष्ट
टेक्निकल अनालिसिस मुख्य उद्देश म्हणजे बाजारातील स्टॉकच्या किमती आणि व्हॉल्यूमसह मागील दिवसाचे चार्ट अनालिसिस करणे आणि त्याच्या आधारावर भविष्यातील किमतीच्या हालचालींचा अंदाज लावणे आहे. पाठीमागील चार्ट चे विश्लेषण करून मार्केट सायकॉलॉजी आणि मार्केटच्या इमोशन समजून घेता येतात. व त्याच्या साह्याने खरेदीचा निर्णय घेता येतो.
टेक्निकल अनालिसिसचे अंतिम उद्दिष्ट भविष्यातील बाजारातील हालचालींचा अंदाज घेणे आणि फायदेशीर व्यवहार करण्यासाठी योग्य वेळी स्टॉक खरेदी किंवा विक्री करण्याच्या संभाव्य संधी ओळखणे हे आहे. टेक्निकल अनालिसिसचा वापर विविध वित्तीय बाजारपेठांमध्ये केला शकतो, ज्यामध्ये स्टॉक मार्केट, करन्सी मार्केट, कमोडिटी मार्केट आणि क्रिप्टोकरन्सी यांचा समावेश होतो. टेक्निकल अनालिसिस ट्रेडर पासून ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे.

Dr.Santosh Suryawanshi Ph.D & SET in Economics
NISM & NCFM Certified