Saturday, June 15, 2024
spot_img
Homeबिझनेस न्यूजआजचे मार्केट ओपन होण्यापूर्वी हे जाणून घ्या

आजचे मार्केट ओपन होण्यापूर्वी हे जाणून घ्या

इंडियन इक्विटी बेंचमार्कने पाठीमागील  आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजारात तेजी नोंदवली  होती.  बीएसई सेन्सेक्स 61,000 पातळीच्या  वरती क्लोज झाला. 28 एप्रिल रोजी  निफ्टी इंडेक्सने सायकॉलॉजिकल 18,000  लेवल पार केली आहे.  सलग पाचव्या सत्रात तेजीचा ट्रेंड  राहिला आहे.

1 टक्‍क्‍यांहून अधिक रॅलीसह आयटी (IT) सेक्टरमध्ये देखील तेजी होती.  Nifty 50 150 अंकांनी 18,065 वर पोहोचला आणि डेली कॅण्डल वर तेजीचा पॅटर्न तयार झाला, असून सलग पाचव्या दिवशी  हायर टॉप  हायर बॉटम फॉर्मेशन सुरू आहे. 

आंतरराष्ट्रीय संकेत

SGX Nifty इंडेक्स 18239 ला ट्रेड करत आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत न्यूट्रल आहेत.सोमवारी अमेरिकन मार्केटने फ्लॅट कारभार केला आहे. फेडरल रिझर्व बँकेच्या कॉमेंट्री ची मार्केट वाट बघत आहे. अमेरिकेतील अडचणीत असलेली फर्स्ट रिपब्लिक बँक जेपी मार्गनने खरेदी केली आहे.

FII आणि DII  डेटा

परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 28 एप्रिल रोजी  3,304.32 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) 264.27 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

2 मे रिझल्ट

 आज दिवसभरात पुढील कंपन्यांचे Q4 चे रिझल्ट येणे अपेक्षित आहे. यामध्ये Nifty50  मधील स्टॉकचा देखील समावेश आहे.  या पार्श्वभूमीवर पुढील सर्व स्टॉक रडारवर राहू द्या.  Tata Steel, Ambuja Cements, Varun Beverages, Birla Cable, Cigniti Technologies, DCM Shriram, Fino Payments Bank, Home First Finance Company India, KEI Industries, Astec Lifesciences, Mold-Tek Technologies, Newgen Software Technologies, Punjab & Sind Bank, Sasken Technologies, Spandana Sphoorty Financial, and UCO Bank 

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. Sir, I have opened account from your link in Dhan.
    Please add me in pro treaders free course.
    I am already member of your premium group.

Comments are closed.

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page