शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात एचडीएफसी ट्विन्स (HDFC Bank & HDFC ) मध्ये झालेल्या सेलिंग मुळे भारतीय बाजारपेठेचा मूळ बिघडला होता. बाजारातील तज्ञ सध्याला हलके प्रॉफिट बुकिंग होणे अपेक्षित धरत आहेत.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक आहेत. अमेरिकन बाजारपेठेत शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात जोरदार कमबॅक दिसून आला आहे. dow jones live 567 (1.65%), Nasdaq Composite इंडेक्स 269 (2.25 %) अंकांच्या तेजीसह बाजार बंद झाला होता. परंतु अजूनही अमेरिकेतील बँकांच्या सेलिंग प्रेशरची भीती बाकी आहे. शुक्रवारी युरोपियन बाजारपेठेमध्ये देखील तेजी दिसून आली आहे.
SGX Nifty इंडेक्स 18153 ला ट्रेड करत आहे.(7.00 AM)
FII आणि DII डेटा
परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 05 मे रोजी 777.68 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) 2,198.77 कोटी रुपयांचे समभाग सेल केले आहेत.
8 मे रिझल्ट
आज दिवसभरात पुढील कंपन्यांचे Q4 चे रिझल्ट येणे अपेक्षित आहे. यामध्ये Nifty50 मधील स्टॉकचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पुढील सर्व स्टॉक रडारवर राहू द्या. UPL, Canara Bank, Indian Bank, Aarti Industries, Apollo Pipes, Birlasoft, CG Power and Industrial Solutions, Craftsman Automation, Exide Industries, Happiest Minds Technologies, HFCL, Kalpataru Power Transmission, Kansai Nerolac Paints, Mahanagar Gas, Pidilite Industries, and VIP Industries