आजचे मार्केट ओपन होण्यापूर्वी हे जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत निगेटिव्ह आहेत. अमेरिकन बाजारपेठेत जोरदार सेल ऑफ दिसून आला आहे. रिजनल बँक इंडेक्स मध्ये देखील जबरदस्त सेलिंग आहे. या इंडेक्समध्ये जवळपास 5.5% ची  घसरण दिसून आली आहे.त्याचबरोबर अमेरिकेतील दिग्गज बँकांच्या शेअर्समध्ये देखील जवळपास 3 टक्क्यापर्यंतची घसरण कालच्या ट्रेडिंग स्टेशनला नोंदवण्यात आली आहे. Dow Jones, S&P 500 आणि Nasdaq  इंडेक्स मध्ये 1 टक्के पेक्षा अधिक घसरण झाले आहे. आज अमेरिकेतील फेडरल रिझर्व बँक 25 bps  ने व्याजाचे दर वाढवणे अपेक्षित आहे.

SGX Nifty इंडेक्स 18145 ला ट्रेड करत आहे.

FII आणि DII  डेटा

परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 28 एप्रिल रोजी  1997 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) 394 कोटी रुपयांचे समभाग सेल केले  आहेत.

3 मे रिझल्ट

 आज दिवसभरात पुढील कंपन्यांचे Q4 चे रिझल्ट येणे अपेक्षित आहे. यामध्ये Nifty50  मधील स्टॉकचा देखील समावेश आहे.  या पार्श्वभूमीवर पुढील सर्व स्टॉक रडारवर राहू द्या.  Titan Company, ABB India, Tata Chemicals, Petronet LNG, AAVAS Financiers, Anupam Rasayan India, Adani Wilmar, Bajaj Consumer Care, Cholamandalam Investment and Finance Company, Godrej Properties, Havells India, Jyothy Labs, KEC International, Mold-Tek Packaging, MRF, R Systems International, SIS, Sona BLW Precision Forgings and Sula Vineyards