ट्रेडिंग जर्नल: ऑप्शन ट्रेडिंग पाया (trading journal)

ट्रेडिंग जर्नल हे  ऑप्शन   ट्रेडिंग चे मूल्यमापन करण्याचे सर्वात प्रभावी  साधनआहे. ते  ऑप्शन ट्रेडरला सातत्याने कामगिरी सुधारण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी मदत करते. 

ट्रेडिंग जर्नल (trading journal)हे तुमच्या  तो रोजनिशी सारखेच असते.  त्याला आपण डायरी असे देखील म्हणू शकतो.  या डायरीमध्ये आपल्याला दिवसभरातील ट्रेडिंगच्या ऍक्टिव्हिटींची प्रॉपर नोंद ठेवायचे असते.  ट्रेडिंग जर्नल मेंटेन केल्यामुळे  आपण करत असलेल्या ट्रेडिंगचे  विश्लेषण करता येते.  आणि नेमके कोणत्या ट्रेड ने आपल्याला खूप फायदा दिला आणि कोणत्या ट्रेड ने आपल्याला खूप नुकसान दिले हे समजते.  त्याचबरोबर आपल्याला कोणत्या दिवशी जास्त प्रॉफिट होते हे पण.  याचा उपयोग करून आपण भविष्यातील आपला परफॉर्मन्स वाढवू शकतो. 

 ट्रेडिंग  जर्नलचे घटक

आपल्याला ट्रेडिंग जर्नल (trading journal) मध्ये ट्रेडिंगच्या सर्व ऍक्टिव्हिटींची नोंद ठेवायची असते.  त्यामध्ये  आपण आज घेतलेले ट्रेड,  इंडेक्सचे नाव जसे की बँकेनिफ्टी, एन्ट्री लेव्हल (Buy level ), स्टॉप लॉस (Stoploss) आणि टारगेट (Target), पोझिशन साइझ (Position size), रिस्क रिवॉर्ड रेशिओ (RR Ratio), तुम्ही ट्रेडमध्ये यशस्वी झालात की नाही, दिवसभरातील मार्केटचे बिहेवियर,  मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड वगैरे डेटाचा समावेश करू शकता. ट्रेडिंगच्या या सर्व नोंदी ठेवल्यामुळे आपल्याला ट्रेडिंगमध्ये सुधारणा करण्यास मदत.

ट्रेडिंग जर्नल तुम्हाला  ट्रेडिंग मधील चुका सुधारण्यास मार्गदर्शन  करते. यामुळे आपली ट्रेडिंग मधील विनिंग प्रोबॅबिलिटी वाढण्यास मदत होते.  त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील तुमची ट्रेडिंग स्टाईल सुधारण्यासाठी आजपासून ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायला सुरुवात करा.

ट्रेडिंग जर्नल  प्रमुख फायदे 

 1. आपली ऑप्शन ट्रेडिंग मधील स्ट्रेंथ आणि  विकनेस समजते.
 2. विनिंग  ट्रेडची संख्या वाढवून सतत वाढवून ट्रेडिंग परफॉरमन्स  देखील सुधारता येतो. 
 3. आपल्याला आपल्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीची जबाबदारी  फिक्स करता येते.. 
 4. मार्केटमधील कोणते टाईम आणि  ट्रेडिंग टेक्निक  आपल्या ट्रेडिंग सायकॉलॉजीला उपयुक्त आहे  समजते. 
 5.  ट्रेडिंग मधील चुकांमध्ये सुधारणा होते. व ट्रेडिंग सायकॉलॉजी बदलते.

ट्रेडिंग जर्नल बनवणे

ट्रॉग जर्नल (trading journal) बनवणे सोपे आहे. ते बनवण्याचे दोन विकल्प आहेत तुमच्या सर्व ट्रेडिंग  ऍक्टिव्हिटीज आणि त्यांच्याशी संबंधित माहिती एखाद्या डायरीमध्ये तुम्ही हाताने लिहा.  किंवा आपल्याकडे लॅपटॉप असेल तर  एक्सेल स्प्रेडशीटमध्ये  देखील  हा डेटा मेन्टेन करता येतो. 

मित्रांनो ट्रेडिंग जर्नल तयार केल्यानंतर त्या ट्रेडिंग जर्नल चा प्रत्येक आठवड्याला रिव्ह्यू घ्या. ट्रेडिंग जर्नल मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत त्यानुसार काम. ट्रेडिंग जर्नल हा तुमचा ट्रेडिंग मधला सर्वात मोठा गुरु बनेल. त्यामुळे प्रत्येकाने आज पासून ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचा प्रयत्न करावा.

5 thoughts on “ट्रेडिंग जर्नल: ऑप्शन ट्रेडिंग पाया (trading journal)

 • Khup important mahiti dilya baddal khup dhanyawad sir. 🙏🏻 Asch velo velo guidence karat raha. Thank you 😊

 • ट्रेडिंग जर्नल लेख *****

  • Great sir mi aajpasunach survat karto lihnyachi

 • खुपचं छान सर आजपासून ट्रेडिंग जर्नल ला सूर्वात करतो

 • खुप छान माहिती आहे.. सर…..ट्रेडिंग जर्नल खुप महत्त्वाचे आहे…आतापर्यंत काय काय केले ते सर्व आठवायचे म्हणजे अवघड आहे …त्यापेक्षा रोज नोंद झाली तर कधीही पाहता येईल…डायरी मध्ये कसे लिहावे याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे….धन्यवाद.

Comments are closed.