MSCI इंडिया इंडेक्समधून अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल बाहेर

MSCI इंडेक्सने गुरुवारी जाहीर केले की अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस आणि इंडस टॉवर्स यांना MSCI इंडिया इंडेक्समधून वगळण्यात आले आहे. हे बदल 31 मे 2023 पासून लागू होतील., दुसऱ्या बाजूला मॅक्स हेल्थकेअर, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि सोना BLW   या स्टॉकचा समावेश MSCI च्या इंडिया स्टँडर्ड इंडेक्समध्ये  करण्यात आला आहे.

हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर आत्ता कुठे आदानी ग्रुप सावरण्याचा प्रयत्न करत होता.  या पार्श्वभूमीवर MSCI इंडेक्सने बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर अदानी ग्रुप साठी हा मोठा धक्का समजला जात आहे. अदानी एंटरप्रायझेसने बुधवारी भागविक्रीद्वारे निधी उभारण्याची योजना जाहीर केली.  याचा परिणाम गुरुवारच्या ट्रेडिंग मध्ये आदानेच्या सर्व स्टॉक मध्ये जोरदार तेजी नोंदवण्यात आली होती. 

फेब्रुवारीमध्ये, एमएससीआयने अदानी समूहाच्या चार समभागांच्या फ्री-फ्लोटमध्ये कपात केली होती. MSCI ने एका  निवेदनात म्हटले आहे की त्यांनी अदानी एंटरप्रायझेस , अदानी टोटल गॅस , अदानी ट्रान्समिशन आणि एसीसीचे (ACC)फ्री फ्लोट्स कमी केले आहेत . ज्या चार कंपन्यांसाठी फ्री फ्लोट बदलाची घोषणा करण्यात आली होती हे बदल 1 मार्च 2023 पासून लागू झाले.