अजीम प्रेमजी यांच्या मालकीची बेंगलोर स्थित विप्रो कंपनीने 27 एप्रिल रोजी शेअर बायबॅक प्रस्तावाचा मार्च तिमाहीचा रिझल्ट दरम्यान विचार करणार. बायबॅक जाहीर केल्यानंतर विप्रोचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान सुमारे 3% वाढून 378 रुपयांवर पोहोचले.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजलाच्या फाइलिंगमध्ये, विप्रोने म्हटले आहे की त्यांचे संचालक मंडळ 26-27 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत कंपनीचे इक्विटी शेअर्स बायबॅक करण्याच्या प्रस्तावावर विचार करतील. “बोर्ड बैठकीचा निकाल 27 एप्रिल 2023 रोजी बोर्डाच्या बैठकीच्या समाप्तीनंतर स्टॉक एक्सचेंजला कळवला जाईल,” असे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. शेअर बायबॅकची घोषणा कंपनीच्या तिमाही निकालांसह केली जाईल.
विप्रोचा शेवटचा शेअर बायबॅक FY21 मध्ये होता. जेव्हा अझीम प्रेमजी-संलग्न संस्थांनी सुमारे 9,156 कोटी रुपयांच्या 22.89 कोटी युनिट्सचे टेंडर दिले होते. 26 April 2022 to 24 april 2023 गेल्या एका वर्षात स्टॉक 28% घसरला आहे.
बायबॅक म्हणजे काय? याचा गुंतवणूकदाराला कसा फायदा होतो
बायबॅक म्हणजे जेव्हा एखादी कंपनी बाजारातून त्यांचे शेअर्स परत स्वतः प्रमोटर विकत घेत असतात. भारतामध्ये सध्या बायबॅकसाठी प्रामुख्याने टेंडर ऑफर किंवा ओपन मार्केट खरेदी या दोन पद्धतीने पूर्ण केले जाते. बायबॅक करण्या पाठीमागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा कंपनीकडे अधिक रोखड शिल्लक असते. ती रक्कम कंपनी स्वतःच्या शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरते. यासाठी कोणताही कालावधी निश्चित नसतो. बायबॅक केल्यामुळे कंपनीतील प्रमोटरचा हिस्सा वाढतो. याचा गुंतवणूकदार व प्रमोटर या दोघांनाही फायदा होत असतो. कोणत्याही कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये जास्तीची रक्कम चांगली मानली जात नाही. त्यामुळे बऱ्याच कंपन्या आपली रोख रक्कम शेअर्समध्ये परत रूपांतरित करतात. बऱ्याच वेळेला कंपनीचा शेअर्स अंडर व्हॅल्यूड असतो तेव्हा देखील शेअर्समध्ये बायबॅक करून शेअर्सला गती देण्याचे काम केले जाते.