Bazaar Bull

Tuesday, January 21, 2025
spot_img
Homeवैयक्तिक वित्तइमर्जन्सी फंड जाणून घ्या! हे आहेत थक्क करणारे फायदे

इमर्जन्सी फंड जाणून घ्या! हे आहेत थक्क करणारे फायदे

-

इमर्जन्सी फंड जाणून घ्या! हे आहेत थक्क करणारे फायदे: संकटं कधीही गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव करत नाहीत. पण आपल्याकडे जर अशा आपत्कालीन परिस्थितीत ‘पैसा’ असेल तर मात्र त्या संकटावर मात करण्याचे बळ हमखास मिळते आणि त्यासाठीच आपल्याला Emergency Fund ही संकल्पना समजून घ्यायला हवी.

अचानक आलेल्या संकटात पैशांची व्यवस्था करणे खूप अवघड असते. अशा वेळी तुम्ही भविष्यासाठी तयार करत असलेल्या निधीचा वापर करून कठीण प्रसंगातून बाहेर पडू शकता, परंतु ज्या कामांसाठी तुम्ही गुंतवणूक केली होती, ती योजना उद्ध्वस्त होते. जर तुम्ही इमर्जन्सी फंड तयार केला असेल, तर तुम्ही कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडू शकता आणि तुम्ही भविष्यातील गुंतवणूकही राहाल. त्यामुळे सर्व बचत आणि गुंतवणुकीसोबतच अशी व्यवस्थाही करावी की, जेणेकरून कोणत्याही आजारामुळे किंवा अपघातामुळे उत्पन्नाचे नुकसान, व्यवसायात किंवा इतर कोणत्याही मार्गाने होणारे नुकसान यातून सहज बाहेर पडता येईल.

आपण बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की, यातील ९९ टक्के लोक हे फक्त आणि फक्त आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने (Financial Mismanagement) केल्यामुळेच संकटात येतात, मग तो गरीब असो की श्रीमंत! त्यांची कारणे वेगवेगळी असतात. Emergency fund  एका वेगळ्याच प्रकारे काढून ठेवायची. आपल्या एकूण उत्पन्नाच्या १० ते ३० टक्के रक्कम ही या कमी वयाच्या पासूनच साठवायला सुरुवात केली, तर पुढे आयुष्यात कितीही मोठे संकट आले, तरी आपण कधीही डगमगून जात नाही. ‘कमवणे आणि खर्च करणे’ म्हणजे आर्थिक साक्षरता नव्हेच.

इमर्जन्सी फंड अशा पर्यायात गुंतवावा जिथून तुम्ही सहज पैसे काढू शकता. आपत्कालीन निधी रोख स्वरूपात किंवा बचत बँक खात्याच्या स्वरूपात असू शकतो. तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडात इमर्जन्सी फंड देखील ठेवू शकता. लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये फक्त मनी मार्केट सिक्युरिटीजची गुंतवणूक केली जाते. यामुळे त्यांच्यामध्ये धोका खूप कमी आहे. तुम्ही मुदत ठेव (FD) किंवा आवर्ती ठेव (RD) मध्ये इमर्जन्सी फंड देखील तयार करू शकता. तुम्ही तुमचा आपत्कालीन निधी तीन भागात विभागू शकता. हे अल्ट्रा शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म आणि मध्यम मुदतीमध्ये विभागले जाऊ शकते. तुम्ही डेट फंडातही गुंतवणूक करू शकता. तुम्ही मुदत ठेव (FD) किंवा आवर्ती ठेव (RD) सारख्या योजनांमध्ये आपत्कालीन निधी देखील जमा करू शकता.

निधीची पुरेशी उपलब्धता.

आपत्कालीन प्रसंगी तुमच्या गरजांसाठी आपत्कालीन निधी पुरेसा असावा.

लिक्विडीटी.

बाजूला ठेवलेला निधी पुरेसा लिक्विड असावा. लिक्विड म्हणजे हा निधी अशा ठिकाणी गुंतवावा कि आपल्याला कधीही उपलब्ध होऊ शकेल. जर आपण बँक खात्यात किंवा लिक्विड फंडामध्ये निधी ठेवला तर तो इंटरनेट बँकिंग किंवा डिजिटल पेमेंट पद्धतींद्वारे सहज उपलब्ध होऊ शकतो.

योग्य परतावा.

आपत्कालीन निधीवर महागाईच्या तूलनेत योग्य परतावा मिळावा अशी व्यवस्था. ज्या ठिकाणी परतावा मिळू शकेल अशा ठिकाणी निधी ठेवला नाही, तर महागाई झपाट्याने वाढत असल्याने निधी निरुपयोगी होईल.

आपत्कालीन निधी ठेवण्यासाठी खालील काही पर्याय आहेत.

बचत खाते(सेव्हिंग अकाउंट ).

मुदत ठेव खाते (फिक्स्ड डिपॉझिट).

आवर्ती ठेव खाते.

लिक्विड फंड.

🚀 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्याची संधी! 🚀

तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचंय? आजच सुरुवात करा!

काय करायचंय:
1️⃣ आमच्या दिलेल्या लिंकद्वारे डिमॅट अकाउंट ओपन करा.
2️⃣ आमच्या प्रीमियम लर्निंग ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
3️⃣ तुमचा ट्रेडिंग प्रवास सुरू करा!

तुमचा प्लॅटफॉर्म निवडा:
✔️ Zerodha: आता अकाउंट उघडा
✔️ Angel One: आता अकाउंट उघडा

📩 ताबडतोब लिंकवर क्लिक करा आणि आजच डिमॅट अकाउंट उघडा!

Santosh suryawanshi
Santosh suryawanshihttps://bazaarbull.in
Dr.Santosh Suryawanshi Ph.D & SET in Economics NISM & NCFM Certified

LATEST POSTS

नवीन वर्षात आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर या ११ गोष्टी करा!

नवीन वर्षात आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर या ११ गोष्टी करा!

Sukanya Samriddhi Yojana in Marathi ...

सुकन्या समृद्धी योजना ज्याला प्रधानमंत्री सुकन्या योजना असेही म्हटले जाते ही नेमकी आहे काय? काय आहेत फायदे, वैशिष्ट्ये घ्या संपूर्ण माहिती!

चाईल्ड म्युच्युअल फंड – मुलांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक

चाईल्ड म्युच्युअल फंड - मुलांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. मुलांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय म्हणजे चाईल्ड...

5 लाखांची गुंतवणूक: तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कसा निवडावा

5 लाखांची गुंतवणूक: तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कसा निवडावा: पुढील 5 दहा वर्षाकरिता करता 5 लाख रुपयांची गुंतवणूक करायची असेल तर, मी खालील क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा...

Follow us

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Most Popular

spot_img

You cannot copy content of this page