Bullish and Bearish Candlestick Patterns in Marathi शेअर मार्केटमधील कँडलस्टिक चार्ट वाचन हे खूप महत्त्वाचे कौशल्य आहे. यामध्ये मारूबोझू पॅटर्न हा एक अतिशय महत्त्वाचा पॅटर्न मानला जातो.
मारूबोझू म्हणजे काय?
मारूबोझू हा असा कँडलस्टिक पॅटर्न आहे ज्यामध्ये कँडलला कोणत्याही प्रकारचा wick (शेडो) नसतो किंवा ती अगदीच अल्प असते. म्हणजेच, कँडल पूर्णतः बॉडीने व्यापलेली असते. हा पॅटर्न खरेदीदार (बुल्स) किंवा विक्रेते (बेअर्स) यांच्या पूर्ण वर्चस्वाचे संकेत देतो.
टेक्निकल अनालिसिस मध्ये जे काही महत्त्वाचे पॅटर्न आहेत यामध्ये मारूबोझू हा एक महत्त्वाचा पॅटर्न आहे आणि याचे चर्चा आज आपण करणार आहे. (Bullish and Bearish Candlestick Patterns in Marathi)
हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ज्याचा टेक्निकल एनालिसिस मध्ये बुलिशनेस म्हणजे बुलिश तीव्रता दर्शविण्यासाठी उपयोगात आणला जातो. म्हणजेच मार्केट किती स्ट्रॉंग बुलिश आहे हे या कॅण्डल मधून दिसते.
मारूबोझू या शब्दाचा जापनीज भाषेत अर्थ ‘टक्कल पडणे म्हणजे केस नसलेला असा होतो. बुलिश मारूबोझू ही मूळात लांब व्हाइट किंवा ग्रीन रंगाची बुलिश कॅन्डल असते. या कॅन्डलच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला शॅडो नसते किंवा खूप छोटी शॅडो असते. ही कॅन्डल तेजीचा मजबूत संकेत समजली जाते. या कॅन्डलमध्ये ओपन प्राईस आणि लो प्राईस सेम असते.या कंडिशनला आपण मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवून कॉल ऑप्शन (CE Option) Buy करण्याची संधी शोधू शकतो.
बुलिश मारूबोझू पॅटर्न (Bullish Marubozu Pattern)
बुलिश मारूबोझू कँडलस्टिक ही कँडल पूर्णतः हिरव्या रंगाची असते, ज्यामध्ये स्टॉकची किंमत दिवसाच्या open किमतीपासून वाढत जाऊन close किमतीवर संपते. यामध्ये विक्रेते अजिबात दबाव टाकू शकत नाहीत. (Bullish and Bearish Candlestick Patterns in Marathi )
हे कधी दिसते?
- अपट्रेंड चालू होण्याचा संकेत.
- मजबूत खरेदीदारांची उपस्थिती.
बेअरीश मारूबोझू पॅटर्न (bearish marubozu)
बेअरीश मारूबोझू हा सिंगल कॅन्डलस्टिक पैटर्न आहे ज्याचा टेक्निकल एनालिसिस मध्ये बेअरीशनेस किंवा मंदीचा अंदाज दर्शविण्यासाठी उपयोगात आणला जातो. म्हणजेच मार्केट किती स्ट्रॉंग बेअरीश आहे हे या कॅण्डल मधून दिसते. बेअरीश मारूबोझू ही मूळात लांब ब्लॅक किंवा रेड रंगाची बेअरीश कॅन्डल आहे जिच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला शॅडो नसते किंवा नगण्य प्रमाणात असते. या कॅन्डलमध्ये ओपन प्राईस आणि हाय प्राईस सेम असते.या कंडिशनला आपण मार्केटवर बेअरीश व्ह्यू ठेवून PE Option Buy करण्याची संधी शोधू शकतो.
बेअरीश मारूबोझू कँडलस्टिक ही कँडल पूर्णतः लाल रंगाची असते, ज्यामध्ये स्टॉकची किंमत open किमतीपासून सतत घसरत राहते आणि close किमतीवर संपते. यामध्ये खरेदीदार प्रभावहीन राहतात. (Bullish and Bearish Candlestick Patterns in Marathi )
हे कधी दिसते?
- डाउनट्रेंड चालू होण्याचा संकेत.
- मजबूत विक्रेत्यांची उपस्थिती.
जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तांत्रिक विश्लेषण शिकायचं असेल, तर मारूबोझू कँडलस्टिक पॅटर्न समजून घेणं अत्यावश्यक आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्या वापराचे काही प्रत्यक्ष उदाहरणे पाहणार आहोत. मग तयार आहात का? चल तर मग शिकायला सुरुवात करूया! 🙌📊
open free demat account zerodha
open free demat account angel broking
Bullish and Bearish Candlestick Patterns in Marathi
Dr.Santosh Suryawanshi Ph.D & SET in Economics
NISM & NCFM Certified