तीन वर्षांत 56 ते 1000 रुपये : मल्टीबॅगर आयटी शेअरने विक्रमी उच्चांक गाठला: मल्टीबॅगर (Aurionpro Solutions Ltd )ऑरिऑनप्रो सोल्यूशन्स लिमिटेडने 2005 ते 2023 या दरम्यान 26 टक्के चक्रवाढ वार्षिक विकास दराने (CAGR) वाढ केली आहे. 14 जून रोजी गुंतवणूकदार आणि विश्लेषक दिनाच्या सादरीकरणादरम्यान कंपनीने म्हटले की, 2005 मधील 100 million रुपयांवरून 2023 मध्ये Rs 6,590 million रुपयांपर्यंत कंपनीचे उत्पन्न वाढले आहे.
याशिवाय मलबार इंडिया फंडाने १४ जून रोजी बल्क डील्सद्वारे 880.23 रुपये प्रति शेअरच्या सरासरी दराने 2.63 लाख शेअर्स किंवा 1.15 % हिस्सा खरेदी केला. मात्र विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार इंडस व्हॅली होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने कंपनीचे 2लाख शेअर्स सरासरी 881.38 रुपये प्रति शेअर दराने विकले आहेत.
ऑरिऑनप्रो सोल्युशन्सचा (Aurionpro Solutions Ltd ) शेअर गेल्या 3 वर्षांत 1439 टक्क्यांनी वधारला आहे. 1 जून 2020 रोजी 56 रुपयांवर बंद झालेला मल्टीबॅगर शेअर आज (15 जून 2023) बीएसईवर 1005.15 रुपयांवर पोहोचला. मल्टिबॅगर ऑरिऑनप्रो सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये तीन वर्षांपूर्वी गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम आज 17.94 लाख रुपयांत बदलली असती. त्या तुलनेत या कालावधीत सेन्सेक्स 90 टक्क्यांनी वधारला आहे.
चालू सत्रात हा शेअर बीएसईवर (BSE) ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटमध्ये (upper circuit) 1005.15 रुपयांवर क्लोज झाला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2392.27 कोटी रुपयांवर पोहोचले.

ऑरिऑनप्रो सोल्यूशन्सचा शेअर एका वर्षात 240% वाढला आहे आणि २०२३ मध्ये 193% वाढला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांच्या सादरीकरणात आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांचा उल्लेख केला, ज्यामुळे आज शेअरभोवती सकारात्मक भावना निर्माण झाल्या. कंपनीचा वार्षिक महसूल वाढीचा दर 25 ते 30 टक्के आणि पीएटी (PAT)मार्जिन 15टक्क्यांहून अधिक राहण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच सध्याच्या आधारापेक्षा वार्षिक वाढीच्या 75टक्के वाढ होत आहे. भविष्यात एबिटडा मार्जिन (ebitda margin) 20 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्याची आणि संशोधन आणि विकासावर सातत्याने 7 ते 8 टक्के खर्च करण्याची कंपनीची योजना आहे. तसेच दीर्घ मुदतीत 25 टक्क्यांहून अधिक परतावा ROE (आरओसीई) कायम ठेवण्याचा मानस आहे.
कंपनी बद्दल
ऑरिओन्प्रो सोल्यूशन्स ही बँकिंग, मोबिलिटी, पेमेंट्स आणि सरकारी क्षेत्रातील गरजा पूर्ण करणारी एक प्रगत तंत्रज्ञान सोल्यूशन्स कंपनी आहे. हे एका छताखाली अनेक तंत्रज्ञान सोल्यूशन्स एकत्र करते, प्रगत आणि त्वरित प्लॅटफॉर्म-आधारित ट्रान्सफॉर्मेशनसाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते, व्यवसायांना डिजिटल जागतिक व्यवस्थेतील नवीन प्रतिमानाशी जुळवून घेण्यास मार्गदर्शन करते.

Dr.Santosh Suryawanshi Ph.D & SET in Economics
NISM & NCFM Certified