मित्रांनो भारतामध्ये स्टॉक चे विविध प्रकार आहेत आणि त्याचबरोबर या स्टॉकचे वर्गीकरण देखील वेगळ्या पद्धतीने केले जाते. आज या लेखाच्या माध्यमातून आपण स्टॉकचे विविध प्रकार आणि त्याचं वर्गीकरण समजून घेणार आहोत. स्टॉकची विभागणी स्टॉकच्या भाग भांडवलावर आधारित केली जाते. भारतात सध्या लार्ज कॅप, मिडकॅप स्मॉल कॅप हे तीन प्रमुख प्रकार पाडले जातात.
लार्ज कॅप: लार्ज-कॅप स्टॉक्स चे भाग भांडवल 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असते. या कंपन्या सुस्थापित आहेत, या कंपन्यांचे ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त असते. त्याचबरोबर या कंपन्या मार्केटचे लीडर स्टॉक म्हणून देखील ओळखल्या जातात. या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे मांडले. ज्यांना सुरक्षित पोर्टफोलिओ तयार करायचा आहे ते प्रामुख्याने या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात. 5 मे 2023 रोजीचे टॉप 10 लार्ज कॅप स्टॉक.
मिड-कॅप स्टॉक: मिड-कॅप स्टॉक्स म्हणजे INR 5,000 कोटी ते INR 20,000 कोटी या दरम्यान बाजार भांडवल असलेल्या कंपन्या. या कंपन्या लार्ज-कॅप कंपन्यांपेक्षा अधिक वेगाने वाढतात आणि त्यांच्या वाढीची क्षमता जास्त असते. परंतु , ते लार्ज-कॅप कंपन्यांपेक्षा धोकादायक देखील आहेत.
स्मॉल कॅप स्टॉक: स्मॉल-कॅप स्टॉक्स INR 5,000 कोटी पेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या कंपन्या आहेत. या कंपन्या सहसा त्यांच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात आणि त्यांच्या वाढीची उच्च क्षमता असते, परंतु त्यामध्ये जास्त जोखीम देखील असते. स्मॉल-कॅप कंपन्यांकडे मर्यादित तरलता असू शकते, ज्यामुळे ते अस्थिर होऊ शकतात.