मुख्य मजकुराकडे जा
BazaarBull BazaarBull अर्थसाक्षर महाराष्ट्र

Asset Allocation Calculator

🧭 मोफत Asset Allocation Calculator

तुमचे पैसे कुठे आणि किती ठेवायचे? हा एकच निर्णय 90% परतावा ठरवतो!

कोणता फंड घ्यायचा यावर लोक महिने घालवतात, पण Equity किती, Debt किती आणि Gold किती — हे कधीच ठरवत नाहीत. तुमचं वय, ध्येय आणि जोखीम सांगा; दरमहा कुठे किती रुपये टाकायचे, पुढे किती निधी तयार होईल आणि वय वाढलं की काय बदलायचं — सगळं एकाच ठिकाणी पाहा.

तुमची माहिती भरा

तुमचं वय वर्षे
मासिक उत्पन्न ₹
मासिक खर्च ₹
दरमहा गुंतवणूक ₹
आजपर्यंत जमलेली गुंतवणूक ₹
ध्येय किती वर्षांनी? वर्षे
दरवर्षी SIP वाढ (Step-up) %
जोखीम घेण्याची तयारी
तुमची सध्याची परिस्थिती
महागडं कर्ज = Credit card, Personal loan, Gold loan (व्याज 12% पेक्षा जास्त)
तुमचा Asset Allocation
70 : 20 : 10
Equity : Debt : Gold
70%Equity मध्ये
अपेक्षित परतावा10.2%
20 वर्षांनी₹2.62 कोटी

💰 दर महिना कुठे किती रुपये टाकायचे

हीच रक्कम SIP करा. फंडाचं नाव महत्त्वाचं नाही — प्रकार (category) महत्त्वाचा.

🧭 हा Allocation कसा ठरला? टप्प्याटप्प्याने

तुमच्या आकड्यांमागचा हिशोब सोप्या भाषेत

    📈 वर्षानुसार तुमचा निधी

    एकूण निधी विरुद्ध तुम्ही भरलेली रक्कम

    एकूण निधी तुम्ही भरलेले

    🗺️ वय वाढलं की Allocation कसं बदलायचं

    हेच प्रमाण आयुष्यभर ठेवायचं नसतं. वर्षातून एकदा, वाढदिवसाला तपासा. पिवळ्या ओळीत तुमचं आजचं वय.

    वयEquityDebtGoldत्या वयात काय करायचं

    ⚖️ जुने नियम विरुद्ध हा कॅल्क्युलेटर

    “100 वजा वय Equity मध्ये टाका” हा नियम सगळेच सांगतात. तो कुठे कमी पडतो?

    नियमEquity सुचवतंकाय निसटतं

    जुने नियम फक्त वय पाहतात. पण खरा प्रश्न दोन आहेत — पैसे कधी लागणार आहेत आणि बाजार 30% पडल्यावर तुम्ही SIP चालू ठेवाल का. म्हणून इथे वय, कालावधी आणि जोखीम तिन्ही एकत्र पाहिली जातात.

    📘 हा कॅल्क्युलेटर काय सांगतो?

    Asset Allocation म्हणजे तुमचे पैसे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये किती वाटायचे हे ठरवणं — Equity, Debt आणि Gold. अभ्यास असं सांगतो की दीर्घकाळात तुमच्या परताव्यातला मोठा भाग कोणता फंड निवडला यापेक्षा हे वाटप कसं होतं यावर ठरतो. म्हणून गुंतवणुकीचा पहिला निर्णय हाच असावा.

    शेतकऱ्याचं उदाहरण: सांगलीच्या एका शेतकऱ्याने चारही एकर फक्त ऊस लावला. भाव मिळाला तर जॅकपॉट, पण पाऊस फिरला की वर्षभराचं उत्पन्न शून्य. शेजाऱ्याने दोन एकर ऊस, एक एकर ज्वारी, अर्धा एकर भाजीपाला आणि अर्धा एकर अडचणीसाठी राखून ठेवला. ऊस बुडला त्या वर्षीही त्याचं घर चाललं. Equity म्हणजे ऊस, Debt म्हणजे ज्वारी, Gold म्हणजे विमा आणि Emergency Fund म्हणजे ती राखीव जमीन.

    • Equity किती: वयानुसार मिळणारा आकडा जोखमीच्या तयारीने कमी-जास्त होतो, आणि मग पैसे कधी लागणार आहेत त्यानुसार त्यावर मर्यादा बसते.
    • कालावधीची मर्यादा सर्वात वरचढ: 1 वर्षात पैसे लागणार असतील तर वय 25 असो वा 60 — Equity शून्य. Equity ला फळ येण्यासाठी किमान 5 ते 7 वर्षं लागतात.
    • Gold 5 ते 10%: विमा म्हणून. यात दागिने धरलेले नाहीत — ते गुंतवणूक नव्हे.
    • Debt कधीच शून्य नाही: बाजार पडल्यावर स्वस्तात Equity घ्यायला पैसे कुठून तरी यावे लागतात. म्हणून Equity जास्तीत जास्त 85% पर्यंतच.
    • Emergency Fund आधी: 6 महिन्यांचा खर्च बाजूला असल्याशिवाय कोणतीही allocation टिकत नाही.
    सूत्र (Formula)
    Equity% = किमान[ (100 − वय) × जोखीम गुणक , कालावधीची मर्यादा ]  ·  Gold% = 5 ते 10  ·  Debt% = 100 − Equity − Gold
    अपेक्षित परतावा = Σ (प्रत्येक भागाचा हिस्सा × त्याचा गृहीत परतावा)

    जोखीम गुणक: सुरक्षित 0.75, संतुलित 1.00, आक्रमक 1.18. कालावधीची मर्यादा: 1 वर्ष → 0%, 3 वर्षांपर्यंत → 20%, 5 पर्यंत → 40%, 7 पर्यंत → 60%, 10 पर्यंत → 75%, त्यापुढे → 85%. गृहीत परतावा: Index 11%, Mid Cap 12.5%, Small Cap 13%, International 10%, Debt 7%, Gold 8.5%. SIP महिन्याच्या सुरुवातीला गुंतवली जाते आणि दर 12 महिन्यांनी Step-up टक्क्यांनी वाढते असे धरले आहे.

    BazaarBull YouTube चॅनल

    शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि Personal Finance सोप्या मराठीत. नवीन व्हिडिओसाठी आत्ताच Subscribe करा!

    🔔 Subscribe करा
    📉 शेअर बाजारातील घसरण म्हणजे सुवर्णसंधी!

    Asset Allocation ठरलं, आता ते प्रत्यक्षात आणायचं आहे? योग्य फंड निवडण्यात अडचण येत असेल तर आम्ही आहोत तुमच्यासाठी!

    👉 आजच तुमचे Demat Account उघडा आणि SIP ची सुरुवात करा. 💡 तुमच्या गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे.

    स्टेप १ · Demat Account

    Angel One

    Demat व Trading अकाउंट ऑनलाइन उघडा. AP Code: SLEQ

    Angel One अकाउंट उघडा →
    स्टेप १ · Demat Account

    Zerodha

    Demat व Trading अकाउंट ऑनलाइन उघडा.

    Zerodha अकाउंट उघडा →
    स्टेप २ · Mutual Fund SIP

    FundzBazar

    म्युच्युअल फंड SIP सुरू करण्यासाठी हीच लिंक वापरा.

    FundzBazar वर SIP सुरू करा →

    ⚠️ Angel One किंवा Zerodha पैकी कोणतेही एक अकाउंट उघडा. SIP साठी FundzBazar लिंक वापरा.

    सं

    प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी

    • 📜 NISM & NCFM Certified · SIF Certified Distributor
    • 🎖️ AMFI Registered Mutual Fund Distributor (ARN: 157995)
    • 📞 +91 84597 75427

    आता गुंतवणुकीची योग्य सुरुवात करा! 🚀

    Disclaimer / महत्त्वाची सूचना

    Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. (म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन आहे; गुंतवणुकीपूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
    • हा कॅल्क्युलेटर केवळ शैक्षणिक व अंदाज दाखवण्यासाठी आहे, गुंतवणूक सल्ला नाही. इथले परतावा दर गृहीत आहेत; ही परताव्याची हमी नाही. प्रत्यक्ष बाजार परतावा दरवर्षी कमी-जास्त होतो.
    • दाखवलेलं Asset Allocation हे सर्वसाधारण नियमांवर आधारित आहे. तुमचं कुटुंब, जबाबदाऱ्या, नोकरीची स्थिरता, विमा आणि कर्ज यानुसार तुमच्यासाठी योग्य वाटप वेगळं असू शकतं.
    • या हिशोबात कर (Tax), Exit Load, Expense Ratio आणि इतर शुल्क विचारात घेतलेले नाहीत. प्रकारानुसार दिलेले परतावा दर केवळ उदाहरणादाखल आहेत, कोणत्याही योजनेची कामगिरी नाहीत.
    • प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी हे AMFI Registered Mutual Fund Distributor (ARN-157995) आहेत. ते SEBI Registered Investment Adviser (RIA) नाहीत. ही कोणत्याही विशिष्ट AMC, योजना किंवा सिक्युरिटीची शिफारस नाही.
    • Past performance may or may not be sustained in future. म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या मुद्दलाचे मूल्य कमी होऊ शकते. वैयक्तिक सल्ल्यासाठी SEBI Registered Investment Adviser चा सल्ला घ्या आणि योजनेचा Riskometer, SID, SAI व KIM वाचा.
    • Mutual Fund Distributor म्हणून, Regular Plan मधील गुंतवणुकीवर संबंधित AMCs कडून Distributor ला कमिशन मिळते. Direct Plan चा पर्यायही गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असतो.
    • Angel One व Zerodha या पानावरील लिंक्स Referral / Authorised Person (AP Code: SLEQ) लिंक्स आहेत. या लिंक्सद्वारे अकाउंट उघडल्यास वितरकाला रेफरल शुल्क किंवा ब्रोकरेजचा वाटा मिळू शकतो. Investments in securities market are subject to market risks, read all the related documents carefully before investing.
    • KYC ही एकदाच करायची प्रक्रिया आहे. फक्त SEBI नोंदणीकृत मध्यस्थांमार्फतच व्यवहार करा. कोणीही खात्रीशीर / Guaranteed परताव्याचे आश्वासन देत असेल तर सावध राहा.
    • या कॅल्क्युलेटरमध्ये भरलेली कोणतीही माहिती साठवली किंवा शेअर केली जात नाही. सर्व गणना तुमच्या ब्राउझरमध्येच होते.
    शेअर करा: WhatsApp Facebook X

    तुमची प्रतिक्रिया लिहा

    Your email address will not be published. Required fields are marked *